ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील क्षमतांचा लेखाजोखा घेताना रुस्तमजी अपटाउन अर्बानियाचे सीईओ अनुपम वर्मा यांनी ठाणे शहराच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेत आपले अनुभवही सांगितले आणि या शहराचा एमएमआर रिअल इस्टेट क्षेत्रात कसे महत्त्व आहे, हेही स्पष्ट केले.
एमएमआर क्षेत्रातील रिअल इस्टेटच्या विस्तीर्ण क्षेत्राचा विचार केल्यास ठाणे शहर एक महत्वाचे दीपस्तंभ म्हणून उभे आहे. आपल्या परिवर्तनासाठी आणि गेल्या काही वर्षांत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीसाठी ओळखले जाणारे ठाणे हे गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण बनले आहे. संधीचे शहर म्हणून ठाणे शहर उदयास आले आहे आणि हे शहर बांधकाम उद्योगाला नवा आयाम देऊ शकते.
मुंबईच्या ईशान्येला वसलेले ठाणे हे शहराचा केवळ उपनगरीय विस्तार नाही; तर हे स्वतःचे अस्तित्व असलेले शहर आहे. ठाण्याच्या कायापालटाबद्दल रुस्तमजी अपटाउन अर्बानियाचे सीईओ अनुपम वर्मा यांनी त्यांचा दृष्टीकोन सांगितला. शहराची क्षमतांचा लेखाजोखा घेण्यासाठी त्यांचे अनुभव आणि त्यांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरते.
दूरचे उपनगर ते समृद्ध शहरी केंद्र असा ठाण्याच्या उत्क्रांतीचा प्रवास आहे. तो काही कमी नाही. मुंबईच्या रिअल इस्टेटला जागेची अडचण येऊ लागल्याने, शहराचा विस्तार त्याच्या परिघात होऊ लागला आणि ठाण्याने या संधीचे सोने केले. आज, हे आता केवळ उपनगर नाही तर एक सुनियोजित, स्वतःची ओळख असलेले वेल-कनेक्टेड शहर आहे.
प्रदूषण पातळीची तुलना केल्यास हे लक्षात येईल की, मुंबईपेक्षा स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण ठाण्यात आहे. शिवाय, ठाण्याने स्वच्छ हवा कृती योजना सक्रियपणे राबवली असून, राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ हवा सर्वेक्षण स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून आपला ठसा निर्माण केला आहे.
ठाण्यातील हिरवळ आणि हिरवेगार परिसर शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे. ठाण्यात जे रहिवासी सोसायट्यांमध्ये राहतात त्यांना समाजिक, सुरक्षितता आणि सुविधांची भावना असते. त्यामुळे, या समुदायांसाठी विकासकांनीही सोयीसाठी किरकोळ स्टोअर्स आणि फार्मसीसह अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांना जगणे आणखी सोपे होते. ठाण्यातील या समुदायातील रहिवाशांसाठी सुरक्षितता सर्वोतोपरी आहे. त्यातून शांतता मिळते. विकासकांनी या समुदायांसाठी देऊ केलेल्या सोयींमुळे या भागात राहणाऱ्यांना त्रासमुक्त आणि आरामदायी जीवनशैली अनुभवता येते.
ठाणे शहराने सामाजिक आणि शांतता या दोन्ही आघाड्यांवरही लक्षणीय छाप सोडली आहे. विवियाना मॉल आणि कोरम मॉलसारखी प्रसिद्ध खरेदीस्थळे तसेच ज्युपिटर हॉस्पिटल आणि लेकसिटी हॉस्पिटलसारख्या प्रतिष्ठित वैद्यकीय सुविधा या ठिकाणी आहेत. रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, हिरानंदानी फाउंडेशन स्कूल आणि लोढा वर्ल्ड स्कूल यांसारख्या शैक्षिणिक संस्थांमुळे शिक्षणही चांगले आहे. शिवाय, उपवन तलावावर विश्रांती घेण्यापासून किंवा नयनरम्य येऊर हिल्सचा आस्वाद घेण्यापर्यंत ठाणे हे शहर विकेंडची मजा लुटण्यासाठीही चांगले आहे. साहस आवडणाऱ्यांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. मनोरंजनासाठी अनेक ठिकाणे आहेत.
ठाण्याची कनेक्टिव्हिटीही उत्तम आहे. अंतर्गत रस्ते एकमेकांशी उत्तमरित्या जोडले गेलेले आहेत. रहिवासी आणि व्यवसायांसाठीही वाहतुकीसाठी उत्तम नेटवर्क आहे. नवी मुंबईतील ऐरोली हे शहरा नवीन आयटी हब म्हणून पुढे येऊ लागले आहे त्याच्याशीही चांगल्या वाहतुकीचे नेटवर्क ठाण्याचे आहे. तेथेही उद्योगांचा वेगाने विस्तार होतो आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, तळोजा आणि विरारमध्ये रोजगार वाढीसाठी १२६ किमी लांबीचा विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर महत्त्वाचा ठरत आहे.
कोपरी पुलाचा ८ लेनचा विस्तार, ठाणे ते बोरिवली यांना जोडणारा १०.२ किमीचा भुयारी बोगदा, ठाण्याला महत्त्वाच्या भागांशी जोडणाऱ्या जलमार्गाचा विकास, ४.४ किमीचा घोडबंदर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि इतरही नवीन फ्लायओव्हर्स, ठाणे-वडाळा मेट्रो आणि ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग हे सर्व प्रकल्प ठाणे शहरासाठी प्रवासाचा वेळ कमी होण्यात महत्त्वाचे आहेत. त्यामुळे रहिवाशांच्या जीवनाचा एकूण दर्जा उंचावण्यासाठी, ठाण्याचा एक समृद्ध शहर म्हणून दर्जा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
ठाण्याच्या रिअल इस्टेट लँडस्केपमधील सर्वात उल्लेखनीय पैलूंपैकी एक म्हणजे त्यातील वैविध्यपूर्ण प्रॉपर्टीज. आलिशान निवासी संकुलांपासून ते वागळे इस्टेटसारख्या भरभराटीच्या व्यावसायिक केंद्रांपर्यंत, ठाणे शहर विविध गरजा पूर्ण करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देते. आज लोक कामासाठी दिवसाचा प्रवास कमी करण्याला प्राधान्य देतात. हेच विकासकांना कर्मचाऱ्यांची कामे जिथे असतील त्या जवळील बाजारपेठेचा शोध घेण्यास प्रवृत्त करते. आधुनिक सुविधा, मोकळ्या जागा आणि निसर्गाच्या सान्निध्यासाठी ठाण्यातील निवासी मालमत्ता ओळखल्या जातात. शहरातील व्यावसायांच्या जागाही व्यवसायांना आणि स्टार्टअप्सनाही आकर्षित करतात. शहरात अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांसह महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. शहरात आता जागतिक दर्जाच्या सुविधा, हिरवीगार जागा आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे हे शहर राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी एक उत्तम ठिकाण बनले आहे.
ठाण्याच्या उल्लेखनीय वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, हे लक्षात घेण्यासारखे आहे की ठाण्यातील सर्वोत्कृष्ट बांधकामाचा दर अंदाजे १५-१७,००० प्रती चौरस फूट (psf) एवढी आहे. त्यातून उच्च दर्जाचे राहणीमान मिळते. याउलट, मुंबई अनेकदा ७०-८०,००० प्रती चौरस फूट (psf) असा दर आहे. त्यामुळे ठाणे शहर केवळ आकर्षक नाही तर परवडणारेही ठरते. कनेक्टिव्हिटीमधील बदल, वैविध्यपूर्ण रिअल इस्टेट पर्याय आणि हरित व शाश्वत राहणीमान यामुळे हे शहर खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांनाही आकर्षित करते. जसजसा या शहराची झळाळी वाढत आहे, तसतसे यामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटही नव्या टप्प्यावर येऊ घातले आहे. त्यामुळे हे शहर प्रगतीच्या दिशने निघालेले शहर आहे. ठाण्याचे रिअल इस्टेट मार्केट प्रत्येकासाठी काही ना काही ऑफर करते. तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला तुमच्या पहिल्या घराचा शोध असेल किंवा एखाद्या कुटुंबाला शांतता हवी असेल किंवा गुंतवणूकदार गुंतवणुकीची संधी शोधत असेल तर ठाणे शहर सर्वांचे आहे. शिवाय सोसायट्यांमुळे ठाणे शहर मुंबईपेक्षा वेगळे ठरते.
एकूणच, ठाणे हे केवळ शहर नाही; तर हे एक समृद्ध, वेगाने वाढणारे आणि आशादायक शहरी केंद्र आहे. हे शहर या भागातील रिअल इस्टेटच्याच भविष्याला आकार देण्यासाठी सज्ज आहे.
