- 1.योजनेचे उद्देश: महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन आणि रोजगार निर्मितीस चालना देणे.
- 2.आर्थिक मदत: पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात दिले जातील.
- 3.लाभार्थी: महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
- 4.पात्रता: महाराष्ट्राचे रहिवासी, बँक खाते असणे आवश्यक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- 5.अपात्रता: ज्या महिलांनी अन्य सरकारी योजनांमधून 1500 रुपये पेक्षा अधिक लाभ घेतला असेल, त्या महिलांना योजना लागू नाही.
- 6.आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड.
- 7.अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन पोर्टल, मोबाइल ॲप, सेतू सुविधा केंद्रांद्वारे अर्ज भरता येईल.
- 8.नियंत्रण अधिकारी: आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे; सहनियंत्रण अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई.
- 9.अर्जांची तपासणी: अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून ऑनलाईन प्रमाणित करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम मंजूरीसाठी अर्ज पाठवला जाईल.
- 10.यादी प्रकाशन: तात्पुरती आणि अंतिम यादी पोर्टल/ॲपवर, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वॉर्ड स्तरावर जाहीर केली जाईल.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजना | BulletsIn
Leave a Comment
Leave a Comment
