cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Article > सारथी : मराठा समाजाच्या विकासासाठी !
Article

सारथी : मराठा समाजाच्या विकासासाठी !

CliQ INDIA
Last updated: November 14, 2023 6:30 pm
CliQ INDIA
Share
6 Min Read
SHARE

राज्यातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असते. याच उद्देशाने राज्यातील विविध जात समूहांची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना, उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने विविध महामंडळ आणि विभागांची निर्मिती राज्य शासनाने केलेली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे (सारथी) ची स्थापना करण्यात आली आहे. सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील 01 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे.

सारथीची संरचना आणि निधीची तरतूद :

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत संस्था म्हणून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथी कार्यरत आहे. शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन 2023-24 या वर्षात 300 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यासोबतच राज्यात सारथीची 8 विभागीय कार्यालये कोल्हापूर, खारघर नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. ही संस्था राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणीकृत असून संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबाजावणी करण्यात येते. सारथीच्या संचालक मंडळावर शासनाने बारा संचालकांची नियुक्ती केलेली आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून संस्थेचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते. सारथी संस्थेचे संस्थापन समयलेख 2018 रोजी नोंदणीकृत केले असून, त्यामध्ये नमूद 3 मुख्य उद्दिष्टे व 82 पूरक उद्दिष्टानुसार संस्थेचे कामकाज सुरु आहे.

सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजना :

उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती :

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 मध्ये 300 विद्यार्थी निवडीसाठीची जाहिरात जूलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामधील पात्र विद्यार्थ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती :

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या वर्षापासून सुरु करण्यात येत असून 4 जुलै, 2023 रोजी मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठीची जाहिरात ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती :

या अतंर्गत सारथीमार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे / विकसित करणे. संशोधन पुर्ण होईपर्यंत परंतू कमाल ५ वर्षाच्या कालावधी करिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे प्रतिमाह 31 हजार रुपये अधिछात्रवृत्ती देण्यात येते. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (csms-deep) राबवण्यात येतो.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती 2022-23 योजना :

यामध्ये एकूण 31.23 कोटी रु. वितरीत करण्यात आले आहे. यासाठी इयत्ता 9 वी व 11 वी मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण, 10 वी मध्ये 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. सारथी संस्थेने वरील अटीसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 800 रुपये प्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. तर मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF)- सारथीमार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ही योजना राबविण्यात येते.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम :

सन 2022-23 पासून ही योजना सारथीतर्फे राबवण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी संख्या 2 हजार 500 इतकी असून फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, कापणीनंतरचे प्रशिक्षण, यामध्ये सामान्य हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन, वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत पाच दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे कामकाज सुरु असून राज्यातील 26 ठिकाणी प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. याचे वार्षिक लाभार्थी 01 हजार असणार आहेत.

सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम :

या कार्यक्रमांतर्गत 35 सेक्टरचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे प्रयोजन आहे. सदर संस्थेमार्फत 20 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांना सूचित करण्यात आले आहे. विद्यार्थी नोंदणी सुरु आहेत.

छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धाचे आयोजन :

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील सर्व तालुक्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध वयोगटातील ५० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरांचे ही राज्यभरात विविध जिल्ह्यांत आयोजन केले जात आहे. ज्याचा विद्यार्थाना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे.

विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प / योजना :

या सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये सारथीमार्फत श्रीमंत मालोजीराजे सारथी इंडो जर्मन टुल रुम प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्र आहेत. या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्यायावत, आधुनिक कौशल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन उद्योगांना आवश्यक रेडी टू वर्क मनुष्यबळ उपलब्ध करणे हा उद्देश आहे. यामध्ये 24 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच इंडो जर्मन टूल रुम प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी संस्थेमार्फत अदा करण्यात येते. याप्रमाणे सारथीमार्फत विविध योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहेत.

– जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

हिंद दी चादर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच !
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजना | BulletsIn
श्रीरामनवमीचे महत्त्व – Hindusthan Samachar Marathi
सार्वजनिक वाहतूक : सामाजिक महत्त्व, मानवकेंद्री विकासाचा अनिवार्य मार्ग
सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article 'ट्रन्सजेंडर्स'ना सशस्त्र दलात घेण्यावर विचार
Next Article आयसीसीकडून विरेंद्र सेहवागसह तिघांचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?