टॉप एंड व्हेरिएंट्सवर एक लाखांपर्यंत सवलत
मुंबई, 8 सप्टेंबर (हिं.स.)। निसान मोटर इंडिया प्रा. लि. (एनएमआयपीएल) ने भारत सरकारच्या नवीन जीएसटी दरांच्या आधारे ग्राहकांना संपूर्ण लाभ देण्याचे जाहीर केले आहे. आगामी सणासुदीच्या काळात ग्राहकांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि देशातील ऑटोमोबाईल उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी कंपनीने सर्व नवे निसान मॅग्नाइट व्हेरिएंट्सवर मोठ्या प्रमाणात किंमत कपात करण्याचे निर्णय घेतले आहेत.
नवीन जीएसटी दरांनंतर, निसान मॅग्नाइट व्हिसिया MT आता 6 लाखांखाली उपलब्ध होऊन भारतीय बाजारपेठेत सर्वात सुरक्षित व परवडणाऱ्या बी-एसयूव्ही मध्ये गणले जात आहे. तसेच, एन-कनेक्टा सीव्हीटी आणि कुरो स्पेशल एडिशन सीव्हीटी व्हेरिएंट्स 10 लाखांच्या खाली उपलब्ध असून ग्राहकांना प्रीमियम अनुभव देण्याचे आश्वासन दिले आहे.
विशेष म्हणजे, टॉप-एंड सीव्हीटी टेकना आणि सीव्हीटी टेकना प्लस व्हेरिएंट्सवर अनुक्रमे 97,300 आणि 1,00,400 इतकी मोठी सवलत करण्यात आली आहे. याशिवाय, सीएनजी फिटमेंट किट आता 71,999 मध्ये उपलब्ध असून ग्राहकांना 3,000 अधिक बचत मिळणार आहे. ही फिटमेंट मोटोझेन सरकार मान्यताप्राप्त विक्रेत्याद्वारे व अधिकृत फिटमेंट सेंटर्समध्ये सुरक्षिततेच्या निकषांनुसार उपलब्ध केली जाईल.
निसान मोटर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्सा यांनी सांगितले,नवीन जीएसटी दर कपात ऑटोमोबाईल उद्योगासाठी सकारात्मक टप्पा असून आम्ही ग्राहकांना संपूर्ण फायदा देण्यास कटिबद्ध आहोत. यामुळे सणासुदीच्या काळात खरेदीदारांचा विश्वास वाढेल आणि बाजारपेठेतील गती सुधारेल.
नवीन किंमती २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील, परंतु ग्राहक आजपासून बुकिंग करू शकतात. सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड, 5-स्टार जीएनसीएपी रेटिंग व 10 वर्षांची विस्तारित वॉरंटी योजना दिली जाणार आहे. नवीन मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन मध्ये “Boldest Black” थीमसह मेटॅलिक ग्रे रंगाचा पर्यायही ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे.
ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या स्मार्ट ग्राहकांसाठी आकर्षक ठरणार असून, सणासुदीच्या हंगामात विक्री वाढीस मदत करेल.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
