मुंबई – गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि सहयोगी कंपन्यांनी खास तयार केलेले एक्सपेरिअन्शिअल लक्झरी लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म, गोदरेज L”Affaire च्या सहाव्या आवृत्तीने एक अनोखे फॅशन सादरीकरण केले. अविस्मरणीय अनुभवासाठी The Label Life सह सहयोग करून नेहमीच्या प्रकारापेक्षा वेगळा आणि थिएटरिकल एक्स्ट्राव्हॅगान्झा आयोजित करण्यात आला. यामध्ये The Label Life”s AM ते PM कलेक्शन अशा प्रकारे प्रदर्शित केले होते की ते प्रत्येकाला आवडेल.
मनमोहक कामगिरीद्वारे विविध पैलूंनी कलेक्शन दाखवून सर्वांना आपलेसे केले. सकाळच्या घाईसाठी कॅज्युअल पोशाखापासून रात्रीसाठी पार्टीसाठी तयार लूकमध्ये बदललेले मॉडेल, मैदानी आणि पिकनिक वेअर – असे विविध प्रकारचे कलेक्शन सादर करण्यात आले.
मॉडेल्स त्यांचे सर्वोत्कृष्ट दिसतील याची काळची गोदरेज प्रोफेशनल स्टायलिस्टने घेतली. त्यांची केशरचना एकंदर रूपाला पूरक ठरली आणि संपूर्ण शोमध्ये उलगडलेली थीमॅटिक सादरीकरणे करण्यात आली.
विविधता हे या शोचे प्रमुख आकर्षण होते. द लेबल लाइफने सर्वसमावेशकतेवर ठाम राहात डाउन सिंड्रोम असलेले मॉडेल, प्लस साईजचे मॉडेल्स आणि विविध जातींमधील मॉडेल्स यांचा यात सहभाग घेतला. फॅशन ही बहिष्काराची असू नये, असे मलायका अरोरा, द लेबल लाइफच्या स्टाइल एडिटर यांनी सांगितले. द लेबल लाइफ हे सर्व महिलांसाठी आहे. आमचा विश्वास आहे की हा आत्म-अभिव्यक्तीचा एक प्रकार आहे आणि तो प्रत्येकासाठी आहे. आमचा सर्व साईज-समावेशक संग्रह सर्व पार्श्वभूमीच्या महिलांना त्यांचे अद्वितीय सौंदर्य स्वीकारण्यास सक्षम करतो. जेव्हा एखाद्या स्त्रीला तिच्या कपड्यांमध्ये आत्मविश्वास वाटतो, तेव्हा तिला स्वतःवर विश्वास वाटतो, जगाचा सामना करण्यास ती तयार असते.
स्टेजवर वसुंधरा यांच्या थेट संगीत सादरीकरणाने वातावरणात नवी उर्जा भरली. तिच्या संगीताने शोच्या ऊर्जेला उत्तम प्रकारे वाढवले. त्यामुळे उपस्थित प्रत्येकासाठी खरोखरच एक तल्लीन करणारा अनुभव बनला.
द लेबल लाइफ कलेक्शनला विशेष बनवणारी एक गोष्ट म्हणजे ते परवडणारे असतात. हा ब्रँड सिद्ध करतो की उच्च-फॅशनला मोठ्या किंमतीसह येणे आवश्यक नाही.
फॅशन शोचे कौतुक करत गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट्स कंपनीजच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी तान्या दुबाश यांनी सांगितले की, “गोदरेज L”Affaire आणि द लेबल लाइफ यांच्यातील हे सहकार्य नाविन्य आणि सर्वसमावेशकतेसाठी आमच्या सामायिक वचनबद्धतेचे उदाहरण देते. लेबल लाइफचे सर्वासमावेशक कलेक्शन अशा सर्जनशील आणि आकर्षक पद्धतीने दाखवून, आम्ही केवळ फॅशन साजरे करत नाही, तर महिलांना त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वीकारण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये आत्मविश्वास अनुभवण्यासाठी सक्षम बनवत आहोत.
गोदरेज L”Affaire आणि द लेबल लाइफ यांच्यातील हे अनोखे सहकार्य जबरदस्त यशस्वी ठरले. यात विविधता होती. सर्जनशील मार्गाने सर्वसमावेशक संग्रहाचे प्रदर्शन केले आणि सर्वांसाठी फॅशन उपलब्ध केले.
