
नांदेड, 5 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत संपन्न होण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे.
त्याचवेळी प्रशासकीय पातळीवर आता श्री विसर्जन व्यवस्थेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दुसरीकडे पोलीस दलही वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत आहेत. नांदेड शहरी भागात श्री विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहरात मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण यांनीही विसर्जन मार्गावरील सर्व व्यवस्था कायम राहील यासाठी प्रयत्न केले आहेत. यावर्षी डीजे मुक्त श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे. या आवाहनाला शहरातील अनेक मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या मिरवणुका डीजे मुक्तच होतील, असा विश्वासही व्यंजने यांनी व्यक्त केला.
सुरक्षेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसेच गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्यांना विसर्जन मिरवणूक काळात शहराबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन दिवस असे व्यक्ती शहरात राहणार नाहीत, याचीही पोलीस खबरदारी घेतील असेही ते म्हणाले.
विसर्जन मिरवणूक काळात गणेश मंडळे आणि गणेश भक्तांनी पोलीस तसेच प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, श्रीमूर्ती या संकलन केंद्रावर द्याव्यात तसेच ज्या ठिकाणी विसर्जन करण्यासंदर्भात सूचना आहेत तेथेच विसर्जन करावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
