विमानात अस्वस्थ वाटल्याने रुग्णालयात नेले
आगरतला, 30 जानेवारी : कर्नाटक क्रिकेट संघाचा कर्णधार सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल याला आज, आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आगरतला येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसल्यानंतर मयंकला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने आगरतला येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. मयांकची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलेय.
नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात मयंक अग्रवाल आपल्या आसनावर बसला. मात्र, विमानाने उड्डाण घेण्याआधीच त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मयंकने भारतासाठी 21 कसोटी सामने खेळले आहे. सोमवारी त्याच्या नेतृत्वात कर्नाटकने त्रिपुरावर 29 धावांनी विजय मिळवला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) अधिकाऱ्याने मयांकला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले परंतु, आजाराचा तपशिल दिला नाही.
