सातारा, 11 जानेवारी (हिं.स.) : माहे जानेवारी 2024 मध्ये जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार 15 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील नियोजन भवन येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आलेला आहे.
महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करण्यात महिलांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाकरिता करावयाचे विहित नमुन्यातील अर्ज संबधितांनी द्विप्रतीत करणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज/ निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक हे तदनंतर येणाऱ्या महिला लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व अर्जासेाबत जोडलेल्या कागदपत्रांसह महिला लोकशाही दिनास उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून यांनी कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार
