नाशिक, ११ जानेवारी, (हिं.स.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या दौऱ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी नाशिकमध्ये येऊन परिस्थितीची पाहणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी 12 जानेवारी रोजी एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून नाशिक नगरी ही सजविण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी बारा वाजता नाशिक मध्ये येतील. त्यानंतर ते ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टर द्वारे पंचवटीची निलगिरी बागेत येती.ल त्यानंतर त्यांचा मिरची पॉईंट ते तपोवन पर्यंतचा रोड शो होणार आहे. या रोड शो नंतर नरेंद्र मोदी हे दक्षिणेची काशी म्हणून ओळख असलेल्या रामकुंडावरती येणार आहेत. त्या ठिकाणी ते गोदावरीची आरती करतील आणि या ठिकाणी परिसराची पाहणी करते. त्यानंतर नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात जाणार आहेत या ठिकाणी ते श्रीरामाचे दर्शन घेऊन आरती करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासनाने देखील गुरुवारी संपूर्ण रंगीत तालीम केली. या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी सायंकाळी आपला ठाणे येथील कार्यक्रम संपल्यानंतर नाशिकला आले. त्या ठिकाणी त्यांनी प्रशासनाची तयारीचा आढावा घेतला प्रत्यक्ष पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार
