जळगाव, 11 जानेवारी (हिं.स.) महावितरण कंपनीच्या ३१५ केव्हीएच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटर आईल चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीच्या मालकीचे ट्रान्सफार्मर असून अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफार्मरमधून १२ हजार ५०० रुपये किमतीचे ५०० लिटर ऑईल चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महावितरणचे कर्मचारी हर्षल नेहते यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर पाटील करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
