पुणे, 26 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्यातील टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्र. 8 येथील साईकृपा लॉजजवळ बॉम्बमध्ये वापरण्यात येणारे जिलेटिन व वायर आढळून आल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तत्परतेने परिसर पिंजून काढला.
टिंगरेनगर येथे विद्यानगर आरोग्य कोठीमधील सफाईसेविका झाडणकाम करीत असताना या ठिकाणी मोकळ्या प्लॉटच्या पत्र्याच्या गेटजवळच्या एक पोते रस्त्यावरील पदपथाच्या बाजूला ठेवलेले दिसून आले. त्या पोत्यात त्यामध्ये स्फोटकसदृश्य वस्तू असल्याचे आढळून आले. ही माहिती पोलिसांना कळवताच त्यांनी तत्परतेने शोध घेतला असता त्यात 138 कांड्या जिलेटिन कांड्या व 135 डिनोनेटर वायरसह, एकूण 10 हजार 920 रु.चा मुद्देमाल सापडला आहे. हे खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असून ते एका बांधकाम व्यवसायिकाचे आहे. बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन तपासणी केली आहे. पुढील कार्यवाही चालू आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
