नाशिक, २८ नोव्हेंबर, (हिं.स.) : विवाहितेचा छळ करून अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पत्नीवर अतिप्रसंग करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला हि १ मे ते १२ जून या कालावधीत सासरी नांदत होती. त्यावेळी पती जीवन उमाकांत पाटील (वय ३१), सासू मीरा पाटील (वय ५६), सासरे उमाकांत चिंध पाटील (वय ६१, सर्व रा. वडाळा पश्चिम, मुंबई) व विशाल सुपडू पाटील (वय २५, रा. रावेर, जि. जळगाव यांनी संगनमत करून विवाहितेला वेळोवेळी किरकोळ कारणावरून कुरापत काढून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच मुंबई, त्रिमूर्ती चौक, सिडको व हॉटेल पंचवटी इलाई या ठिकाणी विवाहितेला नेऊन मोबाईलमध्ये असलेले फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पतीस चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फडोळ करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
