भंडारा २३ डिसेंबर (हिं. स.) : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील लेंडेझरी – गायमुख या भागात आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने वास्तव्य करीत आहे. आदिवासी लोकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणुन प्रशासन वेगवेगळया उपाययोजना करत आहे. मात्र याच भागात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लेंडेझरी – गायमुख हा रस्ता 5 वर्षापुर्वी तयार करण्यात आला होता. मात्र कंत्राटदार यांच्या निकृष्ट कामामुळे काही महिन्यातच रस्ता उखडायला सुरूवात झाली होती. आता तर या रस्त्याने जाणे येणे सुध्दा कठीण झाले असून नागरीकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता तयार करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हिंदुस्थान समाचार
