भंडारा २३ डिसेंबर (हिं. स. ) : भंडारा जिल्ह्यात इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय स्वतःच्याच मुलीला आई वडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा गंभीर प्रकार भंडाऱ्यात घडला आहे. पीडितेच्या काकीने आरोपाची तक्रार पोलिसात केल्यानंतर हा घृणास्पद आणि खळबळजनक प्रकार समोर आला.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील वडद गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. आई वडिलांनीच पोटच्या मुलीचा देहव्यापार ढकलला आहे. पीडितेच्या काकीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिल आणि अन्य एका महिलेसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. तर, एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडिता ही साकोली येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. गावावरून रोज येण्याजण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोली येथील काकाकडे राहून शिक्षण घेत होती. मात्र, कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावाला नेले. बऱ्याच दिवसापासून पीडीतेसोबत बोलणे झाले नसल्याने काकाने 14 डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबीयांची चौकशी केली. यावेळी पीडीतेने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. याप्रकरणी काकूने पुढाकार घेत पीडीतेला साकोली पोलीस ठाण्यात आली याची तक्रार नोंदवली.
पैशासाठी पोटच्या मुलीला आई आणि वडिलांनीच ओळखीतल्या काही इसमांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केली. हा प्रकार वाढत गेलेले महिन्याभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरीत्या अत्याचार करण्यात आले. कधी पिढीच्या गावातील घरीच आई-वडिलांना समक्ष तर कधी साकोली तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडीतेवर मारहाण करीत अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी पिढीतेच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली असून यातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.
हिंदुस्थान समाचार
