नाशिक, २१ डिसेंबर (हिं.स.) : भारतीय लोकशाहिचे मंदिर असलेल्या संसद भवनाच्या पायऱ्यावर तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदिप धनखड यांच्या व्यंगत्वावर नक्कल करुन अवमान करणारे व अशोभनिय वर्तन केले. याप्रसंगी उपस्थित खासदार यामध्ये सहभागी होऊन या नकलीवर हसून दाद देत होते. याचा निषेध करण्याऐवजी कॉग्रेसचे खा. राहुल गांधी यांनी या सर्व प्रकाराची आपल्या स्वत:च्या भ्रमणध्वनीमध्ये चित्रफित काढली. या घटनेचा भारतीय जनता पक्षाने संपुर्ण देशात निषेध केला आहे. उपराष्ट्रपतींचा अवमान सहन करून भाजपा कार्यकर्ते घरात बसु शकत नाही. संवैधानिक पदाचा अपमान करणाऱ्या कल्याण बॅनर्जी व राहुल गांधी यांचा निषेध करून भाजपा कार्यकर्त्यांनी रविवार कारंजा येथे राहुल गांधीच्या पुतळयाला जोडे मारून तीव्र निदर्शने केली आहे. माफी मांगो…माफी मागो… राहुल गांधी माफी मांगो…, कल्याण बॅनर्जी माफी मांगो…., धिक्कार असो …धिक्कार असो…राहुल गांधीचा धिक्कार असो….कल्याण बॅनजीचा धिक्कार असो…, भारत माता की जय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
