भंडारा, हवामान विभागाने भंडारा जिल्हयात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला होता. तर काल रात्री जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. सकाळी सुध्दा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला आहे. या पावसाचा फटका भाजीपाला पीक तसेच आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसला असुन आंब्याचे बार गळून पडले आहे.
