ठाणे, ३० नोव्हेंबर, (हिं.स) : ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील जप्त किमती मुद्देमाल परत घेण्यासाठी फिर्यादी नागरिकांनी तातडीने ठाणे नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी केले आहे.
ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे :- 2 सोन्याची लगड – 9.420 ग्रॅम व 35.320 ग्रॅम, (1. गु.र.नं.287/89 मधील फिर्यादी नामे विजय दगडू मिटकर, रा. कोपरा, भिवंडी, 2.गु.र.नं.355/89 मधील फिर्यादी नामे रवि जयकिशोर ढकोलीया, रा. मोतीराम शेळके चाळ, कोलशेत, ठाणे (पश्चिम)).
2 सोन्याची लगड – 5 ग्रॅम व 3 ग्रॅम (1. गु.र.नं.296/92 मधील फिर्यादी नामे सुरेश बापू(दादु) डीके, रा. आझादनगर, मानपाडा, कोलशेत रोड, ठाणे (पश्चिम), 2. गु.र.नं.483/91 मधील फिर्यादी नामे सौ.दलविंदरकौर संतोसिंग परमार, रा. कोकण भवन, सीबीडी सी/5, I 4/2/2).
1 कोल्हापूरी साज – (243/93 भादंवि 457, 380, भरत दामोदर थोरात, रा. त्रिपाठी चाळ, खोली नं. 03, आझादनगर-1, ठाणे (पश्चिम))
1 सोन्याची लगड -15 ग्रॅम (32/96 भादंवि 454, 380, अब्दुलनारी अब्दुलकरीम सोदागर, रा. शिवाजीनगर, अक्षय अपार्टमेंट, 4 था मजला, रुम नं.20 II राबोडी, ठाणे (पश्चिम))
2 चांदीच्या अंगठ्या – (79/2000, 1.श्रीमती पार्वतीबाई वराराम वाघरी, रा. मुलुंड गोखलेरोड झोपडपट्टी 90 फिट लिंक रोड, सर्वोदय यांची रुम. 2. भटु वराराम वाघरी रा. सदर)
3 सोन्याच्या अंगठ्या- 11 ग्रॅम – (198/08 भादंवि 380, अंकेश इंदरमल जैन, रा. सी-2/501, पंचगंगा लोक उपवन फेज वसंत विहार जवळ, ठाणे)
हा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल बऱ्याच कालावधीपासून पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा आहे. या प्रकरणातील फिर्यादींचे पत्त्यावर ते आढळून आले नाहीत. या किमती मुद्देमालाची निर्गती करणे गरजेचे असल्याने गुन्ह्याची खबर देणाऱ्या फिर्यादींनी प्रथम खबरी अहवाल, आधार कार्ड या कागदपत्रांसह तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अन्यथा हा मुद्देमाल सरकार जमा करण्यात येईल, असे गायकवाड यांनी कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार
