भंडारा २८ नोव्हेंबर (हिं. स.) : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्हयात पावसाने हजेरी लावली आहे. कालपासूनच काळे ढग दाटून आले होते. दिवसभर सूर्यनारायण दिसेनासा झाला होता. अखेर आज सकाळी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सध्या धान कापणी व मळणी सुरू असल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेतावर धान कापून ठेवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पाऊस आल्याने थंडीचा जोर देखील वाढला आहे.
हिंदुस्थान समाचार
