गोंदिया 21 फेब्रुवारी : विकासाच्या बाबतीत सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील भजेपार-बोदलबोडी गावातील वाघ नदीवर मोठे पुल मंजूर असून दोन वर्षापासून बांधकाम रखडलेले आहे. बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे व ढिगारे अर्धवट ठेवल्याने जुना मार्ग देखील बंद झाला. त्यामुळे नागरीकांना १ किमी अंतरावर जाण्यासाठी १५ कीमी फेऱ्याने पायपीट करून जावे लागत असल्याने गावकर्यांन आक्रोश पाह्यला मिळत आहे. या संदर्भात गावकर्यांनी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने अखेर संतप्तलेल्या दोन्ही गावातील नागरिकांनी नदी पात्रता उतरून अर्ध जलसमाधी आंदोलन करून शासनाचा निषेध केला आहे.
