नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : एनडीए एक्स्पो ऑटम टर्म- 2023 चे उदघाटन 27 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए ) कुटुंब कल्याण संस्थेच्या अध्यक्ष रेमन कोचर यांनी केले. हा कार्यक्रम एनडीए क्लब्सच्या विविध उपक्रमांचे प्रतिनिधित्व करतो.यानिमित्ताने 23 इनडोअर आणि आउटडोअर छंद वर्गांच्या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून त्यात एनडीए कॅडेट्सनी सहभाग घेतला आहे आणि हे प्रदर्शन 27 – 29 नोव्हेंबर 2023 ला अभ्यागतांसाठी खुले राहील.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एनडीए कॅडेट्समधील सर्जनशील प्रतिभा पाहण्याची संधी मिळेल.
या अनोख्या प्रबोधिनीच्या 75 गौरवशाली वर्षांची झलकही या प्रदर्शनात पहायला मिळते. तरुण लष्करी नेत्यांमध्ये एकत्रितपणे काम करण्याची आणि लष्करी नीतिमूल्ये विकसित करत त्यांना अभिव्यक्तीची संधी उपलब्ध करून देत; त्यांच्या वेळेचा सर्जनशील वापर करत, त्यांच्यातील अनेक कलाकौशल्ये विकसित करत, त्याचा सन्मान करण्याची संधी या निमित्ताने या प्रदर्शनातून मिळत असते. क्लबच्या प्रदर्शनांतून गेल्या 75 वर्षांमध्ये प्रबोधिनीचा विविध प्रकारे झालेला विकास आणि वाढ दिसून येते. हे प्रदर्शन आयोजित केल्यामुळे कॅडेट्सचा उत्साह आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या संगमाने कॅडेट्सच्या कलागुणांना वाव मिळाला आहे.
हिंदुस्थान समाचार
