गोंदिया २८ नोव्हेंबर (हिं. स.) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या बाघ् नदी येथे श्री विठ्ठल रुक्मणी ट्रस्ट कोरणी घाटच्या वतीने माँ गंगाच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 5 हजार दिवे लावून माँ गंगाची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी विठ्ठल रुखमनी ट्रस्टचे सचिव केतन तुरकर यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून या महाआरतीचे आयोजन करण्यात येत असून पुढील काळात याहीपेक्षा भव्य दिव्य अशी महाआरती करणार असल्याचे आयोजक केतन तुरकर यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
