पुणे, 24 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडली असून ही निवडणूक आता ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यासंदर्भात महापालिकेने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर विभागीय आयुक्तांनी नव्या तारखेला मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या नियोजनानुसार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पहिली विशेष सभा घेण्यात येणार आहे. याच सभेत महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक लांबणीवर पडल्याने महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्व पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकीकडे शहराचे लक्ष लागले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
