ठाणे, २३ नोव्हेंबर, (हिं.स) गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक श्रेयासाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रखडवून ठेवलेले आहे. यासाठी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री व अखेर पंतप्रधानांकडेही नवी मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी औपचारिक उद्घाटन न करता सुरू केली त्याच धर्तीवर दिघा गाव रेल्वे स्थानक ही विलंब न लावता तत्काळ सुरु करा अशी मागणी पत्राद्वारे केली.
परंतु याची दखल घेत नसल्याने जनतेच्या पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून जे स्थानक प्रवाशांसाठी बांधले आहे. त्या जनतेच्या प्रश्नासाठी व जनतेच्या हक्कासाठी आज ऐरोली व दिघा गाव रेल्वे स्थानकात शिवसेना नेते खासदार राजन विचारे तसेच शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये नागरिक व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन उस्फूर्त प्रतिसाद या मोहिमेला दिला आहे.
यावेळी शिवसेना नेते व ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, उपनेत्या ज्योती ठाकूर, संपर्क प्रमुख संतोष जाधव, विद्याधर चव्हाण, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, संदीप पाटील विजय देसाई, उपशहर प्रमुख श्रीकांत मोरे, जितेंद्र गवते, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, नगरसेवक करण मढवी, सचिन पाटील, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले, अशोक सकपाळ, संदीप पवार, मंगेश साळवी, विजयानंद माने, प्रमोद कदम, मुकुंद ठाकूर, संजय तुरे व इतर शिवसेना पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
