नृत्यांगनेला विवस्त्र नृत्य करण्यास पाडले भाग
भंडारा २३ नोव्हेंबर (हिं. स.) : भंडारा जिल्ह्यात मागील आठवडाभरात तीन महिलांचे शोषण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महिला आणि मूली कितपत सुरक्षित असा प्रश्न विचारला जात आहे.
गावातच मंडई बघण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा १५ ते १७ टवाळखोरांनी विनयभंग केला. एवढेच नाही तर टवाळखोरांनी तिला बेदम मारहाणही केली. हा गंभीर प्रकार मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे उघडकीस आला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी आठ तरुणांविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. गावात मंडई असल्याने मामेभावासोबत रात्री ही पीडित तरुणी मंडई बघण्यासाठी गेली होती. तरुणी व तिचा मामेभाऊ रस्त्यावर उभे असताना १५ ते १७ तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी तरुणीचा विनयभंग केला. यानंतर तरुणांनी दोघांनाही काठीने बेदम मारहाण केली. यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. पीडितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत नाकाडोंगरी येथे आपल्या मनोरंजनासाठी चक्क एका नृत्यांगनेला विवस्त्र नृत्य करण्यास भाग पाडल्याची घटना घड़ली आहे.
दरम्यान भंडारा पोलिसांनी ही घटना घडल्या नंतर आपले सोपस्कार पार पडले आहे. बेटाळयात टोळक्याद्वारे मारहाण प्रकरणी मोहाडी पोलिसांनी 8 लोकांना ताब्यात घेतले आहे. तर नृत्य डान्स प्रकरणी आयोजकाला अटक करण्यात आली आहे. ठाणे हवालदाराची बदली तर २ पोलिसांचे निलंबन ही प्रशासकीय कारवाई सुद्धा झाली आहे.
हिंदुस्थान समाचार
