सिडको, ३० ऑक्टोबर (हिं.स.) : अंबड गावातील मातोश्री संकुल येथे वर्धमान मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील मोबाईल ॲक्सेसरीज व रिपेरिंग साठी आलेले जुने १० ते १२ मोबाईल फोन असा एवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोबाईल चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सुमारे एक ते दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला आहे. विशेष म्हणजे चोरटा एकटाच चोरी करण्यासाठी आला होता. एकट्या चोरट्याने शटर वाकवून आत प्रवेश करीत चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
हिंदुस्थान समाचार
