cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > संरक्षक दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी उडचलो द्वारे सर्वसमावेशक आर्थिक सेवा
Business

संरक्षक दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी उडचलो द्वारे सर्वसमावेशक आर्थिक सेवा

CliQ INDIA
Last updated: October 26, 2023 8:00 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

पुणे, 26 ऑक्टोबर (हिं.स.) संरक्षक दल आणि त्यांच्या परिवार जनांसाठी समर्पितपणे कार्य करणारी अग्रगण्य ग्राहक तंत्रज्ञान कंपनी उडचलोने (udChalo) संरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना ज्या आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यास तोंड देता यावे म्हणून आर्थिक नियोजन सेवांचा एक सर्वसमावेशक संच सादर केला आहे. कंपनीने आर्थिक-तंत्रज्ञान विषयक उपाययोजनांचे (फिनटेक सोल्यूशन्स) ‘बचत’(सेविंग्स) आणि ‘गुंतवणूक’ (इन्व्हेस्टमेंट) अशा दोन व्यापक प्रकार आणले आहेत, जे त्यांना संपूर्ण आणि सर्वसमावेशक असे आर्थिक सेवांचे सहाय्य देतील. कर्जापासून गुंतवणुकीपर्यंत, कर बचतीपासून अन्य आर्थिक विषयांपर्यंत वेगवेगळे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीने घेण्यासाठी संरक्षण दलातील लोकांना उडचलो (udChalo) प्रदान करत असलेले उपाय सक्षम करतील.

‘बचत’ (सेविंग्स) च्या क्षेत्रात उडचलो (udChalo) कर भरण्याच्या सेवा देते आणि ग्राहकांना अधिक चांगल्याप्रकारे बचत करण्यासाठी अधिकाधिक सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करते. अति कर्जातून होणारा तोटा ओळखून उडचलो (udChalo) ने अशा संस्थांबरोबर भागीदारी केली आहे ज्या बऱ्याच कमी व्याजदरामध्ये कर्ज देतात. यामुळे ग्राहक मोठ्याप्रमाणात बचत करू शकतात. विचारपूर्वक ‘गुंतवणूकी’साठी उडचलो (udChalo) ने बँकांमध्ये मुदत ठेवीपासून सुरुवात केली आहे. ज्यामध्ये संरक्षक दलातील कर्मचारी, बँकांच्या शाखांना वारंवार प्रत्यक्ष भेट देण्याचा त्रास टाळून, अन्य सामान्य बँकांपेक्षा सरासरी १% जास्त कमवू शकतात. या ठेवी रिझर्व्ह बँकेकडून पाच लाखांपर्यंत संरक्षित असतील. याशिवाय, कंपनी लौकरच म्यूच्युअल फंड देखील सादर करणार आहे; जे त्यांच्या आयुष्यातील जी ध्येये आहेत त्यांच्यानुसार अनुकूलित केले जाईल आणि जे त्यांना स्वतःच्या किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, सेवानिवृत्तीनंतर व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा एक चांगला आर्थिक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी मदत करेल.

या पुढे जाऊन, रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीचे महत्व देखील लक्षात घेऊन कंपनी आपल्या ग्राहकांना त्या क्षेत्रातील संधींचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे आणि अनेक शहरांमध्ये किफायतशीर घरांचे पर्याय देऊन सहकार्य करत आहे. यातून त्यांना कर बचतीच्या सर्व पर्यायांपैकी सर्वाधिक म्हणजे ३.५ लाखांपर्यंतची कर सवलत मिळविण्याची संधी मिळते. यामुळे दीर्घकाळामध्ये ५४एफ भांडवली नफा कर सवलतींमधून लाभ घेता येईल. नाहीतर कदाचित हा लाभ उशिरा केलेल्या रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीमुळे ते गमावू शकतात.

उडचलो (udChalo) चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी कुमार याबाबत म्हणाले, “विशेषतः लौकर सेवानिवृत्तीची शक्यता आणि त्यांच्या सतत वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने आमच्या संरक्षण दलांसाठी धोरणात्मक आर्थिक नियोजन अत्यावश्यक आहे. आपल्या या शूरवीर जवान आणि वीरांगनांना दुर्गम व आव्हानात्मक अश्या प्रदेशांमध्ये काम करावे लागत असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये फारशी आर्थिक जागरूकता नसल्यामुळे बऱ्याचवेळा त्यांना सेवानिवृत्तीनंतर करीअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य आर्थिक मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांनी मेहनतीने मिळवलेली कमाई अनेकवेळा धोक्यात येते. आपल्या संरक्षक दलातील जवानांचे जीवन सुखकर करण्यासाठी उडचलो (udChalo) कटिबद्धता आहे. ही वचनबद्धता त्यांच्या खास आर्थिक गरजा पूर्ण करण्यापर्यंत विस्तारलेली आहे. आपल्या सैनिकांना त्यांच्या सेवेच्या काळात आणि सेवानिवृत्तीनंतर देखील अखंड आर्थिक सुरक्षिततेचा आनंद घेता यावा यासाठी अथक प्रयत्न करणे हे आमचे ध्येय आहे. असे करून आम्ही त्यांना आर्थिक तणाव न घेता आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम करतो.”

संरक्षण दलातील जवान बहुतांशवेळा लौकर सेवानिवृत्त होतात. म्हणजे वयाच्या ३५ व्या वर्षी देखील ते निवृत्त होतात. त्यावेळेस त्यांची मुले लहान म्हणजे अगदी शाळेत असतात. त्यामुळे अशावेळी जवानांचे आयुष्य सोपे व सुखकर करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या उडचलो (udChalo) ने प्रवास, परिवर्तन किंवा गतिशीलता (मोबिलिटी), गृहनिर्माण, आर्थिक-तंत्रज्ञान (फिनटेक) आणि अजून अशा बऱ्याच क्षेत्रांना समाविष्ट करुन आपल्या सेवांचा विस्तार केला आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त खास घोषणा
वस्त्रोद्योगासाठी पीएलआय योजनेंतर्गत नवीन अर्ज स्वीकारण्यास केंद्राची मुदतवाढ
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा-दिवाळी ठेव योजनेत ६.८० कोटीच्या ठेवी
अपेडाचे बांगलादेश, कतार, मलेशिया, यूएसएबरोबरच्या काजू निर्यातीला सहाय्य
पॉलिकॅब इंडिया लिमिटेड – तिसऱ्या तिमाहीचे आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी संस्था चालक विनय अ-हाना पोलिसांच्या ताब्यात
Next Article हिंगोली : ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?