रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने जाहीर केलेल्या दसरा दिवाळी ठेव योजनेत आतापर्यंत ६ कोटी ८० लाखांच्या ठेवी संकलित झाल्या आहेत.
पतसंस्थेच्या एकूण ठेवी २९४ कोटी ४९ लाख झाल्या आहेत. दसरा दिवाळी ठेव योजनेत आतापर्यंत ६ कोटी ८० लाखांच्या ठेवी संकलित झाल्या असून ४७० खात्यात नवीन ठेवी संकलित झाल्या, तर ६० खातेदार नव्याने संस्थेची जोडले गेले.गेल्या ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षानंतर गेल्या ८ महिन्यात संस्थेकडे २९ कोटी ३४ लाख नव्याने ठेवी जमा झाल्या. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात ३०० कोटींचा ठेव टप्पा पूर्ण होईल, असा विश्वास संस्थाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा स्वनिधी ४२ कोटी २२ लाख इतका भक्कम असून संस्थेने वितरित केलेल्या कर्जाची वसुली ९९.३१ टक्के आहे, तर संस्थेचा एनपीए शून्य टक्के आहे. संस्थेचा सीडी रेशो ६१.७३ टक्के एवढा आदर्शवत आहे, तर सीआरएआरचे प्रमाण २५.३५ टक्के इतके लक्षणीय आहे. स्वरूपानंद पतसंस्था दसरा दिवाळी ठेव योजनेसोबत १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या दिवसात सहकार सप्ताहाला अनुलक्षून दसरा दिवाळी ठेव योजना १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून ठेवीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
