नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : उद्योग हितधारकांच्या विनंत्या लक्षात घेऊन, वस्त्रोद्योग मंत्रालयाने एमएमएफ वस्त्रप्रावरणे, एमएमएफ फॅब्रिक्स आणि तांत्रिक कापडाच्या उत्पादनांसाठी वस्त्रोद्योगाच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना पीएलआय अंतर्गत इच्छुक कंपन्यांकडून नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत पीएलआय पोर्टल पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रालयाने आता योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकृतीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यायचा निर्णय घेतला आहे.
हिंदुस्थान समाचार
