सिंधुदुर्ग, 18 ऑक्टोबर : कुडाळ येथील भूषण जडये स्कूल ऑफ फोटोग्राफीतर्फे वर्षेपूर्तीनिमित्त फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे फोटो प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
लॅंडस्केप फोटोग्राफी हा या फोटोग्राफी स्पर्धेचा विषय आहे. यासाठी फोटो 8* x 12 या साईज मध्येच प्रिंट करून द्यावा. अन्य साईजचा फोटो स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. फोटो मोबाईलवर सेंड करू नये. फक्त फोटो प्रिंट स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. फोटोच्या पाठीमागे आपले नाव आणि फोन नंबर लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक स्पर्धकाला फक्त एक फोटो पाठवता येईल. २५ ऑक्टोबर हि फोटो पाठवण्याची शेवटची तारीख आहे, या तारखेननंतर आलेले फोटो स्विकारले जाणार नाहीत. तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील.
या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकासाठी रोख रुपये १ हजार किंवा फोटोग्राफी कोर्स फी मध्ये सवलत, दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये ५००/- आणि तिसऱ्या क्रमांकासाठी भेटवस्तू अशी पारितोषिके आहेत.
सकाळी १० ते संध्यकाळी ५ या वेळात भूषण जडये फोटो इन्स्टिट्यूट मध्ये फोटो स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोमवार ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता, भूषण जडये स्कूल ऑफ फोटोग्राफी, ४था मजला, आशीर्वाद भवन. कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ येथे होणार आहे. नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी 7887682146 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संचालक आर्या श्रीराम जडये यांनी केले आहे.
