ठाणे, 2 डिसेंबर (हिं.स.) श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित ३४ वी जिल्हा स्तरीय व अंतर्गत शरीर सौष्ठव श्री मावळी मंडळ श्री स्पर्धा नुकतीच संस्थेच्या क्रीडांगणात झाल्या. या स्पर्धेमध्ये अंतर्गत व जिल्हास्तरीय मिळून एकूण १४ व ५३ अशा ६७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.ह्या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांनी केले. अंतर्गत व जिल्हास्तरीय किताब विजेत्यांना बक्षिस देण्यासाठी प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, विशेष अतिथी पोलीस उपनिरीक्षक ठाणे व राष्ट्रपती पदक विजेते सुरेश मोरे व ठाणे जिल्हा शरीर सौष्ठव संघटना अध्यक्ष अमित नांदगावगकर उपस्थित होते. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, खजिनदार दिनेश मोरे, चिटणीस रमण गोरे, सह चिटणीस संतोष सुर्वे, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस, विश्वस्त रवींद्र आंग्रे व विश्वस्त केशव मुकणे उपस्थित होते.
सदर स्पर्धेत अंतर्गत श्री मावळी मंडळ श्री किताब. अभिषेक शिवराम घुग यांने पटकविला.तर, जिल्हास्तरीय श्री मावळी मंडळ श्री किताब लाईफ स्टाईल जिम उल्हासनगरच्या मोहम्मद जमाल याने पटकविला. ह्या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद सलग तिसऱ्यांदा ए बी एस स्टुडिओ जिम ठाणे (१७ गुण), तर सांघिक उपविजेतेपद लाईफ स्टाईल जिम उल्हासनगर (१५ गुण) यांना मिळाले.
ह्या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:
१. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता – श्री. विवेक शिवानंद सिंग (ए बी एस स्टुडिओ जिम, ठाणे)
२. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता १ ला – श्री. प्रशांत मोहन कुमार (मसल हंट जिम, कल्याण)
३. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता २ रा – श्री. आशिष सुदाम वेल्हारे (ओम महारुद्र व्यायाम शाळा, डोंबिवली)
४. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता ३ रा – श्री. बादल मुस्तफा अन्सारी (प्रो हेल्थ क्लब, कल्याण)
गट विभागाचे निकाल पुढीलप्रमाणे : जिल्हास्तरीय निकाल :
गट पहिला (उंची : १६५ सेमी. खालील / लहान गट ):
क्रमांक १ – अक्षय जयंत कोल्हटकर (अपोलो जिम, कळवा)
क्रमांक २ – भावेश नितीन रोनी (ए बी एस स्टुडिओ जिम, ठाणे)
क्रमांक ३ – सुभाष मिथाईलाल यादव ( लाईफ स्टाईल जिम, उल्हासनगर)
क्रमांक ४ – स्वप्नील सुरेश वाघमारे (अपोलो जिम, कळवा)
क्रमांक ५ – विजेंद्र जयवंत दिवेकर (दया जिम, भिवंडी)
क्रमांक ६ – निलेश तुफानी गुप्ता (भंडारी जिम्नॅशियम, भिवंडी)
क्रमांक ७ – अमेय मनोज शिंदे (ए बी एस स्टुडिओ जिम, ठाणे)
गट दुसरा (उंची : १६५ सेमी.-१७० सेमी. / मध्यम गट ):
क्रमांक १ – मोहम्मद जमाल (लाईफ स्टाईल जिम, उल्हासनगर)
क्रमांक २ – संजय दामू पवार (स्कल्प्ट फिटनेस क्लब, कल्याण)
क्रमांक ३ – विष्णु भगवान वाकडे (मसल हंट जिम, कल्याण)
क्रमांक ४ – दिनेश नारायण रोकडे (श्री मावळी मंडळ, ठाणे)
क्रमांक ५ – विपुल सुनील पाटील (आर फिटनेस सेंटर, ठाणे)
क्रमांक ६ – हिफाशूर रेहमान खान (हसीब खान जिम व फिटनेस, भिवंडी)
क्रमांक ७ – राजकुमार हरिदास पाटील (शाहू जिम फिटनेस, भिवंडी)
गट तिसरा (उंची : १७० सेमी.-१७५ सेमी. / उंच गट ):
क्रमांक १ – प्रशांत मोहन कुमार (मसल हंट जिम, कल्याण)
क्रमांक २ – रोशन दत्ताराम जाधव (बॉडी क्राफ्ट फिटनेस, ठाणे)
क्रमांक ३ – पराग विश्वनाथ माने (मॉन्स्टर फॅक्टरी जिम, ठाणे)
क्रमांक ४ – विशाल प्रवीण बागुल (मसल बिझ फिटनेस क्लब, कल्याण)
क्रमांक ५ – संतोष मारुती चिंचवडे (श्री मावळी मंडळ, ठाणे)
क्रमांक ६ -राजेश दशरथ मणेश (लाईफ स्टाईल जिम, उल्हासनगर)
क्रमांक ७ – निकेत अरुणकुमार सिंग (लाईफ स्टाईल जिम, उल्हासनगर)
गट चौथा (उंची : १७५ सेमी. वरील / अति उंच गट ):
क्रमांक १ – यश दीपक दळवी (ओलंपिया जिम, कल्याण)
क्रमांक २ – कृष्णा रमेश जाधव (ए बी एस स्टुडिओ जिम, ठाणे)
क्रमांक ३ – आशिष सुदाम वेल्हारे (ओम महारुद्र व्यायाम शाळा, डोंबिवली)
क्रमांक ४ – ओंकार संतोष सावंत (ए बी एस स्टुडिओ जिम, ठाणे)
क्रमांक ५ – मझहर इस्माईल सय्यद (युनिव्हर्सल फिटनेस, भिवंडी)
क्रमांक ६ – अभिषेक शिवराम घुग (श्री मावळी मंडळ, ठाणे)
क्रमांक ७ – आकाश तुकाराम घायतडकर (बॉडी झोन, कल्याण)
अंतर्गत स्पर्धा : गट पहिला (उंची : १६५ सेमी. खालील / लहान गट ):
क्रमांक १ – देवांक संजय शेलार
क्रमांक २ – राजेंद्र प्रकाश दामुगडे
क्रमांक ३ – सोहम शामसुंदर केळुसकर
क्रमांक ४ – आदित्य प्रकाश सामेळ
गट दुसरा (उंची : १६५ सेमी.-१७० सेमी. / मध्यम गट ):
क्रमांक १ – नरेंद्र दाजी शिंदे
क्रमांक २ – आलेण कांबळ कुरेशी
क्रमांक ३ – अभिषेक संजय पानसरे
गट तिसरा (उंची : १७० सेमी.-१७५ सेमी. / उंच गट ):
क्रमांक १ – भुषण रमाकांत पेडणेकर
क्रमांक २ – उमेश रामचंद्र दाभेकर
क्रमांक ३ – खलील अनुउला शेख
गट चौथा (उंची : १७५ सेमी. वरील / अति उंच गट):
क्रमांक १ – अभिषेक शिवराम घुग
क्रमांक २ – सुमित रमेश भगत
क्रमांक ३ – मोहमद जेद शेख
क्रमांक ४ – ओंकार दिनेश उतेकर
हिंदुस्थान समाचार
