नाशिक, – ग्रँडमास्टर दिप्तायन घोष हे राष्ट्रीय जलद बुद्धीबळ स्पर्धेचे विजेता ठरला तर इंटरनॅशनल मास्टर अरोण्यक घोष ग्रँडमास्टर ऋत्विक राजा(तेलंगणा),ग्रँडमास्टरआर्यनदिप दास (रेल्वे) हे उपविजेते ठरले.
भारतीय क्रीडा मंत्रालय,भारतीय क्रीडा प्राधिकरण ,भारतीय बुद्धीबळ महासंघ, आणि महाराष्ट्र बुद्धीबळ संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा बुद्धीबळ संघटनेमार्फत, या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बाग डेव्हलपमेंट आणि बिल्डर, सागर स्विट, इंडिया इन्फोलाईन सिक्युरीटी लिमिटेड, नोवेल फायन्सियल सोल्युशन हे स्पर्धेचे प्रायोजक होते .
स्पर्धेत रेल्वेच्या आणि तेलंगणाच्या खेळाडुंचे वर्चस्व बघायला मिळाले. स्पर्धेच्या सुरवातीला संभाव्य विजेता म्हणून बघितला जाणाऱ्या,राष्ट्रकुल स्पर्धा विजेता मित्रभा गुहा यास स्पर्धेत आश्चर्यकारक पराभवाला सामोरे जावे लागले. तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा फिडे मास्टर सुयोग वाघ आश्चर्यकारकरित्या सहाव्या राहिला.विजेत्यांना ग्रँडमास्टर प्रविण ठिपसे व डॉ.विजय घाडगे यांचा हस्ते रोख बक्षिस तसेच आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून आर. अनंतराम यांनी काम बघीतले तर साह्ययक पंचांची भुमिका गुरु दयाल प्रजापती,स्वप्निल बनसोड,संदेश नगरनाईक, श्रद्धा विंचलेकर मोहित लढे ,प्रवीण ठाकरे, अजिंक्य पिंगळे,गौरव रे पौर्णिमा उपलाविकर,जुईली कुलकर्णी, शार्दुल तापसे , यशवंत पवार आणि हेमानी बजाज यांनी काम बघीतले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा खजिनदार जयेश भंडारी, अजिंक्य तरटे जयराम सोनवणे, सचिन व्यवहारे, पदाधिकाऱ्यांनी परिक्षम घेतले.
