पुणे, 8 फेब्रुवारी : लोणारेमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवात खो-खो स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विजेते पद मिळाले आहे. तसेच मुलींच्या खो खो संघालाही उपविजेतेपद मिळाले आहे. यासह मुलींच्या कबड्डी संघाला उपविजेतेपद, मुलांच्या च्या कबड्डी संघाला उपविजेतेपद मिळाले आहे. तसेच विद्यापीठाला जनरल चॅम्पियनशिपही मिळाली आहे. या विजेत्या कामगिरीचे कौतुक करत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर आणि प्रभारी कुलगुरू प्रा.(डॉ.) विजय खरे यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, फुटबॉल, आणि बुध्दिबळ या खेळांचा सामावेश होता. महाराष्ट्रातील २३ विद्यापीठांतील अंदाजे २००० विद्यार्थी ५०० संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक सहभागी झाले होते.
