रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फुटबॉल असोसिएशनने येत्या १९ मे रोजी १७ वर्षांखालील वयोगटातील मुलींसाठी फुटबॉल निवड चाचणी आयोजित केली आहे. ही निवड चाचणी डेरवण येथील एसव्हीजे स्पोर्टस अकादमीमध्ये येथे होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १७ वर्षांखालील फुटबॉल खेळणाऱ्या मुलींचा संघ या चाचणीद्वारे निवडण्यात येईल. निवडण्यात आलेल्या मुलींना पालघर येथे १ ते १० जूनदरम्यान वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने १३ वर्षांखालील मुलांची आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धा ३० मे २०२४ दरम्यान शिरपूर (धुळे) येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा फुटबॉल संघ सहभागी होणार आहे.
जिल्ह्यातील १३ वर्षांखालील वयोगटातील मुलांसाठी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
