नाशिक, २७ फेब्रुवारी – मुंबई येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत नाशिकच्या अनुज व अनुजा या भावंडांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत नाशिकच्या सहा स्पर्धकांनी विशेष या संपादन केले.
मुंबई येथे सुंक रॉक ते गेटवे ऑफ इंडिया पाच किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. नाशिक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या जलतरणपटूंनीया स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवले.
जलतरणपटू अनुजा उगले हिने मुलींमध्ये तर मुलांमध्ये अनुज उगले याने प्रथम क्रमांक पटकाविला. सोहम खांबेकर दुसरा, दिव्या महाजन चौथी, मधुरा शर्मा आठवी व आकांक्षा राणा दहावी आली.तसेच स्वानंदी केळकर, राज वाणी, अर्णव सोंनजे, आरव पाटील, वरूण पाटील, अनिकेत वाघमारे यांनी ही जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.या सर्व स्पर्धकांना राजेंद्र निंबाळते, निनाद निंबाळते व श्रीराम सांगळे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
