cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे ऐतिहासिक द्विशतक!
Sports

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे ऐतिहासिक द्विशतक!

CliQ INDIA
Last updated: November 8, 2023 7:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

पणजी, 8 नोव्हेंबर (हिं.स.) : ‘ह्या वेळी २०० पार’ या निर्धाराने उतरलेल्या महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील पदकांचे ऐतिहासिक द्विशतक साकारले. महाराष्ट्राच्या युवा शिलेदारांच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे राज्याची शान देशभरात उंचावली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मंगळवारी १३व्या दिवशी प्रामुख्याने ट्रायथलॉन, कबड्डी, कयाकिंग या क्रीडा प्रकारांत पदके मिळाली. पदकतालिकेतील अग्रस्थानावर पहिल्या दिवसांपासून विराजमान असलेल्या महाराष्ट्राच्या खात्यावर ७० सुवर्ण, ६४ रौप्य, ६९ कांस्यपदकांसह एकूण २०३ पदके आहेत. सेनादल (५५ सुवर्ण, २४ रौप्य, ३३ कांस्य, एकूण ११२ पदके) दुसऱ्या आणि हरयाणा (५० सुवर्ण, ४१ रौप्य, ५५ कांस्य, एकूण १४६ पदके) तिसऱ्या स्थानावर आहेत.

ट्रायथलॉन शर्यतीमधील मिश्र रिले विभागात महाराष्ट्राने सुवर्णपदक जिंकले आहे. महिलांच्या वैयक्तिक विभागात याआधी सोनेरी यश मिळवणाऱ्या मानसी मोहितेचे या पदकातही महत्त्वाचे योगदान होते. योगासने क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या वैभव श्रीरामेने सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. बॉक्सिंगमध्ये ऋषिकेश आणि यश गौड बंधूंनी कांस्यपदकांची कमाई केली. कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून २९-३९ असा पराभव पत्करल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कयाकिंग शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवी रायकवारने कांस्यपदकाची कमाई केली.

महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला खो-खो संघांनी अनुक्रमे केरळ आणि कर्नाटकचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारी महाराष्ट्राचे दोन्ही संघ ओडिशाशी सुवर्णपदकासाठी झुंजतील. हॉकीमध्ये अखेरच्या सहा मिनिटांत कर्नाटकने तीन गोल नोंदवल्यामुळे युवराज वाल्मीकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे सुवर्णस्वप्न भंगले. कर्नाटकने ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला. आता महाराष्ट्राचा संघ बुधवारी उत्तर प्रदेशशी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकाची लढत खेळणार आहे. बीच हँडबॉल क्रीडा प्रकारातील अखेरच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने केरळविरुद्ध ९-११, १०-१३ असा निसटता पराभव पत्करला. नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या सोनम मस्करला सहावा क्रमांक मिळाला. ज्युदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला दोन कांस्यपदकांची हुलकावणी मिळाली.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

वाशिम – जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना लवकरच उपलब्ध होणार सुविधा
सागरी जलतरण स्पर्धेत नाशिकच्या जलतरणपटूंची चमक
शनिवारपासून ''नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४'' क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या तळामध्ये परतले, आरसीबी विरुद्ध हा सामना जिंकणे गरजेचे आहे
८ वी राज्य अंजिक्यपद : पुरुष गटात नाशिक शहर संघ तर महिला गटात सांगली संघ विजयी | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मध्य रेल्वेच्या बिकानेर आणि साईनगर शिर्डी दरम्यान उत्सव विशेष ट्रेन
Next Article नाशिक : एमडी कारखान्याप्रकरणी दोघांची चौकशी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?