सातारा, 4 डिसेंबर (हिं.स.) – एम .आर. एफ. सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप राऊंड (पाच) कर्नाटक राज्यातील मंगळूरू येथील स्पर्धेत सातारचा श्लोक विक्रम घोरपडे हा तीन विविध प्रकारात तीन विजेतेपदाचा बहुमान मिळवणारा खेळाडू ठरला.
प्रत्येक गटामध्ये त्याने दोन मोटो एकावेळी जिंकत सोळा वर्षाखालील गटात तसेच खाजगी स्वरूपातील या गटातही तो विजेता ठरला आहे. ए लाईट एस एक्स वन प्रकारात मोटो वन मध्ये तो संपूर्ण स्पर्धेत अग्रभागी राहिला तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याने तिसऱ्या क्रमांकावर आपली स्पर्धा पूर्ण केली. मात्र, कोणतीही भय आणि भीती न बाळगता एक वेगळ्या संचारातून त्याने एस एक्स वन या प्रकारातील दोन अंतिम मोटो पूर्ण करून एस एक्स वन प्रकारात तो सर्वात मानांकित आणि अग्रभागी ठरला.
श्लोक याला पाचव्या राऊंडसाठी बेस्ट रायडर म्हणून विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याला डॉ. सुदीप कोटेगर हे मार्गदर्शक म्हणून लाभले. तसेच गॉड स्पीड रेसिंग या स्पर्धेचे प्रमुख संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिले असून श्लोक साठी त्यांनी सहकारी आणि प्रायोजकत्व स्वीकारले होते.
श्लोक याचे विशेष कौतुक त्याचे आजी, आजोबा तसेच उषा शानभाग व रमेश शानभाग यांनी करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्लोक हा सातारा येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक विक्रम घोरपडे व आचल घोरपडे यांचा चिरंजीव असून श्लोक याने 800 मीटर चा सर्वात लांब ट्रॅक पन्नास laps मध्ये पूर्ण करून आता पुढील आठवड्यात एमआरएफ मो ग्रिप सुपर क्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सहाव्या आणि अंतिम राऊंडसाठी तो कर्नाटक राज्यातील मैसूर करिता निवडला गेला आहे. श्लोक याच्या या विशेष कामगिरीचे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून त्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार
