सातारा, 21 डिसेंबर (हिं.स.) : येथील सुप्रसिद्ध मोटोक्रॉसपटू श्लोक विक्रम घोरपडे याने सर्वात कमी वयात व युवा खेळाडू म्हणून संपूर्ण देशात मोटोक्रॉस स्पर्धेत विशेष मानांकन मिळवले आहेत.
मात्र या 2023 वर्षांमध्ये तब्बल चार नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावून श्लोक ने एक आगळी वेगळी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. संपूर्ण देशातील विविध ठिकाणी संपन्न झालेल्या एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिपच्या 4 राऊंडमध्ये आणि एमआरएफ नॅशनल सुपर क्रॉस चॅम्पियनशिपच्या 6 राउंड मध्ये एकूण 11 ठिकाणी त्याने आपला सहभाग नोंदवला आणि वेगवेगळ्या तीन गट प्रकारात त्याने हे यश संपादन केले आहे.
सोळा वर्षाखालील ज्युनिअर एस एक्स 1 क्लास या गटात तसेच प्रायव्हेटर्स एस एक्स 2 क्लास आणि फॉरेन ओपन एस एक्स 1 क्लास या गटात त्यानेही यशस्वी कामगिरी करून दाखवली आहे.
संपूर्ण भारताच्या रेसिंग स्पर्धेच्या आव्हानात्मक प्रकारात श्लोकने अतिशय सुरेख आणि सुंदर कामगिरी करून हे यश संपादन केले आहे .या वर्षात त्याने विविध प्रकारच्या 33 ट्रॉफी आणि दोन बेस्ट रायडर ट्रॉफी या डर्ट ट्रॅक आणि सुपर क्रॉस प्रकारात जिंकलेले आहेत.
सातारा शहरातून तो सर्वप्रथम असे मानांकन मिळवणारा खेळाडू असून त्याने नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत बेस्ट रायडर ट्रॉफी मिळवून एक आगळावेगळा इतिहास रचला आहे. श्लोकने या सर्व उत्तुंग कामगिरीचे श्रेय हे आपले आई-वडील परिवार आणि त्याचे प्रशिक्षक व मार्गदर्शक डॉ.सुदीप कोटेगर -टीम केअर गॉड स्पीड रेसिंग संस्था व त्याला मिळालेल्या प्रायोजकांसह सर्व हितचिंतकांना दिले आहे.
हिंदुस्थान समाचार
