सातारा, 26 डिसेंबर, (हिं.स.) : येथील श्यामसुंदरी चारिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के .एस. डी. शानभाग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या शिवतेज सुधीर नगरकर याचा द्वितीय क्रमांक आला आहे. शिवतेजने आपल्या खेळाची चुणूक दाखवत विशेष संपादन केले आहे.
किड्स स्काय अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेतील झेड फोर कॅटेगिरी मध्ये शिवतेज सुधीर नगरकर यांचा द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.शिवतेज हा शानभाग विद्यालयांमध्ये इयत्ता तिसरीचा विद्यार्थी असून त्याला कल्याणी नाईक मॅडम व निकम मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग ,संचालिका आँचल घोरपडे ,विद्यालय व कनिष्ट महाविदयालयाच्या प्राचार्या सौ. रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांनी अभिनंदनअभिनंदन करून त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार
