नाशिक, १३ जानेवारी, (हिं.स) : समाजातील गरजूंसाठी गुलाबी थंडीत हजारो नाशिक कर धावले व नाशिक रन च्या सामाजिक उपक्रमास हातभार लावला.आज रोजी संपन्न झालेल्या या उपक्रमास संस्थापक विश्वस्त सर्वश्री सौमित्र भट्टाचार्य, चेअरमन रश्मीरंजन भूयान, व्हाइस चेअरमन अशोक पाटील, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार, विश्वस्त रमेश शालींग्राम आणि नाशिक रन करता मोलाचे सहकार्य करणारे सुमित बजाज, आशिष सहा, जॉय अलूर, शशांक बठारिया, दयानंद कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
२००३ साली नाशिक रन या समाजसेवी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. २००३ ते २०२४ ह्या काळात ४०० हुन अधिक गरजू संस्थांना नाशिक रन तर्फे मदत करण्यात आली असून क्रीडा सामाजिक , शैक्षणिक व आरोग्य विषयक तसेच कोरोना काळातील वर्ष वगळता २००३ ते २०२४ हा नाशिकचा समाजसेवेचा प्रवास अविरतपणे चालू आहे. नाशिक रन हा लोकप्रिय उपक्रम सालाबादप्रमाणे महात्मा नगर क्रीडांगणावर संपन्न झाला. ह्या उपक्रमात जवळजवळ ५००० हुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.
हिंदुस्थान समाचार
