अहमदनगर, 29 ऑक्टोबर(हिं.स.):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे व विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय,नागपुरच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी विभा गीय क्रीडा संकुल मानकापुर,नागपुर येथे नुकतीच पार पडली.यात १७ वर्षाखालील वयोगटात संजीवनी अकॅडमीचा अष्टपैलु खेळाडू साई योगेश भागवत याची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली,अशी माहीती संजीवनी अकॅडमीच्या वतीने देण्यात आली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देवुन त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यासाठीची तळमळ संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांची असायची.वयाच्या ९३ व्या वर्षीही ते रोज सकाळी स्कूलमध्ये जावुन तेथील कामकाजाची आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती घ्यायचे.त्यांनी घालुन दिलेली शैक्षणिक आचारसंहिता स्कूलच्या संचालिका डॉ.मनाली कोल्हे या संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेत आहे.यामुळे संजीवनी अकॅडमीचे विध्यार्थी देश पातळीवर सुध्दा वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन कीर्तिमान स्थापित करीत आहेत.साईची महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.डॉ. मनाली कोल्हे यांनी साईला प्रशस्तीपत्र देवुन सत्कार केला.यावेळी प्राचार्या शैला झुंजारराव व क्रीडा प्रशिक्षक सुजय कल्पेकर उपस्थित होते.साई आता आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अक्षय येवले,सुजय कल्पेकर व क्रीडा विभाग प्रमुख विरूपक्ष रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान मधील बिकानेर येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत आहे.
हिंदुस्थान समाचार
