cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > मॉस्को हल्ल्यामध्ये आयएसआयएसचा हात
InternationalSports

मॉस्को हल्ल्यामध्ये आयएसआयएसचा हात

CliQ INDIA
Last updated: March 23, 2024 4:02 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

भीषण हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू 100 हून अधिक जखमी

मॉस्को, 23 मार्च  रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहरात शुक्रवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. मॉस्कोच्या किनाऱ्यावरील कॉन्सर्ट हॉलमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 60 जण मृत्यूमुखी पडले असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इजिप्त एण्ड सिरीया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

मॉस्कोमध्ये शुक्रवारी रशियन रॉक बँड पिकनिकच्या परफॉर्मन्ससाठी गर्दी जमली असताना हा हल्ला झाला. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने सांगितले की, या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 150 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी स्फोटके फेकल्यानंतर लागलेल्या आगीत आणखी लोक अडकले असण्याची शक्यता काही रशियन वृत्तपत्रांनी व्यक्त केली. आरोग्य अधिकाऱ्यांनी 145 जखमींची यादी जाहीर केली. त्यापैकी 115 जण रुग्णालयात दाखल असून यात 5 बालकांचा समावेश आहे. सैनिकांच्या वेशात अनेक जण कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी कॉन्सर्टमध्ये सहभागी होणाऱ्यांवर गोळीबार केला. रशियन माध्यमांनी आणि टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वारंवार गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. एका व्हिडिओत रायफल घेऊन दोन जण कॉन्सर्ट हॉलमध्ये फिरताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या व्हिडिओत प्रेक्षागृहातील दहशतवाद्यांनी सभागृहाला आग लावल्याचे एक व्यक्ती सांगत आहे. अन्य व्हिडिओमध्ये 4 दहशतवादी असॉल्ट रायफल घेऊन पॉईंट ब्लॅंक रेंजवर ओरडणाऱ्या लोकांवर गोळ्या झाडताना दिसत आहेत. रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॉस्कोचे विमानतळ, रेल्वे स्थानके आणि राजधानीतील भुयारी मार्गावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रशियाच्या इतर भागांनीही सुरक्षा व्यवस्था कडक केली.रशियाच्या काही लोकांनी यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्याच्या काही तास आधी रशियन लष्कराने युक्रेनच्या वीज यंत्रणेवर जोरदार हल्ला चढवला होता. ज्यामुळे देशातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आणि इतर ऊर्जा सुविधा कोलमडल्या होत्या. ज्यामुळे दहा लाखांहून अधिक लोकांना विजेपासून वंचित राहावे लागले.

दरम्यान मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. मॉस्कोतील भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे मोदी यांनी ट्विटरवर जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या दु:खाच्या क्षणी भारत सरकार आणि रशियन फेडरेशनच्या जनतेच्या पाठीशी उभा असल्याचे मोदींनी म्हंटले आहे.

 

You Might Also Like

पॅरिस ऑलिम्पिक : भारताच्या नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक | BulletsIn
श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशचा नझमुल हुसेन कर्णधारपदावरुन पायउतार
ज्युनियर,सबज्युनिअर पॅरानॅशनल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत २ सुवर्णपदके | BulletsIn
छ. संभाजीनगरात १९ जानेवारीपासून नमो चषक २०२४
ट्रंप चीनला जात आहेत, शी जिनपिंगशी उच्चलेख्य भेट होणार, व्यापार ताणाव आणि इराण संकट आघाडीवर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी माढ्यामध्ये भेटीगाठी घेऊन केली राजकीय चाचणी
Next Article संपूर्ण आम आदमी पार्टीच ईडीच्या रडारवर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?