लंडन, 2 जुलै (हिं.स.)
सर्बियाच्या
नोव्हाक जोकोविचने विम्बलडनच्या दुसऱ्या फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे.
अलेक्झांडर म्युलर विरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात त्याने ६-१, ६-७, ६-२, ६-२
ने बाजी मारली. दुसऱा सेट गमावल्यानंतर जोकविचला तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये
अलेक्झांडरने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुभवाच्या जोरावर
जोकोविचने विम्बल्डनमधील आपला विजय साकारला. आता दुसऱ्या फेरीत त्याचा मुकाबला डॅन
इव्हान्सशी होणार आहे.
विम्बल्डनमध्ये
तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झेव्हरेव्हला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
त्याला बिगर मानांकित आर्थर रिंडरकेंचकडून ६-७, ७-६, ३-६, ७-६, ४-६ ने पराभव सहन करावा
लागला. २०१९ नंतर पहिल्यांदा झेव्हरेव्हला कुठल्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या
पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.
महिलांमध्ये
अमेरिकेची कोको गॉफही पहिल्याच फेरीत विम्बल्डमधून बाहेर पडली आहे. तिला
युक्रेनच्या डायाना यात्रेमस्काकडून ७-६-६-१ अशा सरळ सेटमध्ये पराभव सहन करवा
लागला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
