सातारा, 14 डिसेंबर (हिं.स.) : १२५ वा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजऱ्या करणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणेचे न्यू इंग्लिश स्कूल, साताराचा यावर्षीचा वार्षिक क्रीडा महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ येत्या रविवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा. न्यू इंग्लिश स्कूल, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा नितीन माधवराव तारळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमास सर्व आजी माजी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, सर्व हितचिंतकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन न्यू इंग्लिश स्कूलचे शाळा प्रमूख एकनाथ बुरसे, क्रीडा महोत्सव प्रमुख चंद्रशेखर पानस्कर, अध्यक्ष, शाला समिती अमित कुलकर्णी, क्रीडा महोत्सव उपप्रमुख संदीप काळे, क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर गुरव यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
