धुळे, 7 नोव्हेंबर (हिं.स.) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय नेटबॉल ( 14,17 वर्ष मुले व मुली ) क्रीडा स्पर्धेचे आयेाजन 7 ते 10 नोव्हेंबर,2023 या कालावधीत गरुड मैदान, धुळे येथे करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी एका प्रसिद्धी दिली आहे.
यास्पर्धेत राज्यातून 575 खेळाडू, 50 पंच व पदाधिकारी असे एकूण 625 सहभागी होत असून या स्पर्धेचे उद्धटन बुधवार दि. 8 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते होणार आहे. व गुरुवार दि.9 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 11 वाजता बक्षिस वितरण समारंभाचे आयेाजन करण्यात आले आहे. तरी या राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेस खेळांडू, नागरिक व वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
