स्टेट लेव्हल अंडर -१४ क्रिकेंट टुर्नामेंट
नाशिक, ०५ जानेवारी (हिं.स.) : नाशिक मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात जळगावने मध्य विभागावर १ डाव व १८० धावांनी मोठा विजय मिळवला. एस एस के क्रिकेट मैदानावर जळगावच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो विराज मंधवानी. वीराजने अष्टपैलू कामगिरी करत पहिल्या डावात ७ व दुसऱ्या डावात ५ बळी घेतले नी दहाव्या क्रमांकावर येत सर्वाधिक नाबाद ७४ धावा केल्या. मध्य विभागाच्या ध्रुव पुंडने एका डावात ५ बळी घेतले. तर दुसऱ्या सामन्यात जळगावने सोहम जैनच्या ७ व ५ बळी या जोरदार कामगिरीमुळे डी ए आर सी वर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले. डी ए आर सीच्या रणवीर चव्हाणने देखील डावात ५ बळी घेतले.
इतर सामन्यात एम सी सी क्रिकेट मैदानावर पहिल्या सामन्यात मध्य विभागाने सांघिक कामगिरी च्या जोरावर नांदेडवर १ डाव व ४९ धावांनी विजय मिळवला. ध्रुव पुंडने दोन्ही डावात ३-३ बळी घेतले . दुसऱ्या सामन्यात विजय क्लबने नांदेडवर १ डाव व ३२ धावांनी विजय मिळवला. विजय क्लबच्या हर्ष पाष्टे व प्रथमेश नागपुरेने तसेच नांदेडच्या चैतन्य पवारने देखील एका डावात ५ बळी घेतले.
हिंदुस्थान समाचार
