मुंबई, 5 जानेवारी (हिं.स.) : ‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये निशी आणि ओवीच्या आयुष्यात प्रेम परिक्षा चालू आहे. ओवीने निर्णय घेतला आहे लंडनला परतण्याचा. तर दुसरी कडे निशी- नीरजच्या प्रेमाला लागला आहे पूर्णविराम. रघुनाथच्या शब्दात निशी अडकली आहे आणि नीरजला सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार झाली आहे. पण ह्या सर्व गोष्टींची नीरजला कल्पना नाही. नीरजने, निशीला प्रोपोज करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे, एक सुंदर अंगठी ही घेतली आहे. निशी, नीरजचे प्रयत्न पाहून क्षणभरासाठी खुश तर होते पण तिच्या मनावर ताण येतोय जेव्हा नीरज तिला लग्नाची मागणी घालतो.
निशीला सगळ्या घटनांचा दबाव आल्याने ती आता काय निर्णय घेईल ? ओवीने लंडनला जायचा निर्णय घेतला आहे हे श्रीनूला कळल्यावर तो तिला मनातलं सगळं सांगून तिला थांबवायचा विचार करेल का? उमा कशी करणार निशी आणि ओवीची मदत ?
हिंदुस्थान समाचार
