
चंद्रपूर 30 डिसेंबर (हिं.स.):- तालुका स्तरावर प्रथमच होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नियोजनाने येथे आलेले खेळाडु व प्रशिक्षक भारावले आहेत.त्यांची भोजन व्यवस्था उत्तम ठेवण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान विसापूर तालुका क्रीडा संकूल येथे रोज 2500 ते 3000 जणांसाठी सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण, सांयकाळी चहा-कॉफी आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत खेळाडू, प्रशिक्षकांना नास्ता दिला जातो. यात दिवसनिहाय मिसळ पाव, उपमा, पोहे, साबुदाणा खिचडी, वडासांबार, फळे, ब्रेड बटर, टी-कॉपी यांचा समावेश असतो. दुपारचे जेवण 12.30 ते 3.30 यावेळेत दिले जाते. याय दोन भाज्या (मिक्स व्हेज, वांगे, आलूमटर, सोयाबीन मटर व इतर भाज्यांपैकी कोणत्याही दोन) कडी, वरण, मसाला भात, पोळ्या, लोणचे, पापड, ग्रीन सलाद, चटणी आणि एक स्वीट यांचा समावेश असतो. तर रात्रीच्या जेवणात एक व्हेज भाजी व इतर पदार्थ दुपारच्या जेवणाप्रमाणेच असून रोज नॉन-व्हेज तयार करण्यात येते. तसेच कधी रबडी, व्हेजपुलाव, हलवा, आईसस्क्रीम आणि दूध देखील देण्यात येत आहे. भोजनाची संपूर्ण व्यवस्था बघण्यासाठी 250 ते 300 जणांची टीम कार्यरत आहे.
हिंदुस्थान समाचार
