cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > वर्धा – प्रवाशांच्या सोईसाठी दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा फे-या
Regional

वर्धा – प्रवाशांच्या सोईसाठी दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा फे-या

CliQ INDIA
Last updated: November 9, 2023 5:00 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

वर्धा, 8 नोव्हेंबर, (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभागाच्यावतीने दिवाळी निमित्त दि.8 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत वर्धा पुणे, वर्धा औरंगाबाद, वर्धा तिरोडा व वर्धा नांदेड या मार्गावर बसच्या जादा फे-या सोडण्यात येणार आहे. जादा बसफेरींचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कालावधीत वर्धा पुणे ही बस दुपारी 6 वाजता व सायंकाळी 5.30 वाजता वर्धा येथून निघणार व पुलगाव, अमरावती, अकोला, चिखली, औरंगाबाद मार्गे पुणे येथे पोहोचणार असून सदर बसचे भाडे प्रौढांसाठी 1 हजार 555 रुपये व जेष्ठ नागरिकांसाठी 780 रुपये आकारण्यात येणार आहे. वर्धा तिरोडा ही बस वर्धा येथून सकाळी 7.30 वाजता सुटणार असून नागपूर, भंडारा मार्गे तिरोडा येथे पोहोचणार आहे. या बसचे भाडे प्रौढांसाठी 335 रुपये व जेष्ठ नागारिकांसाठी 170 रुपये आकारण्यात येणार आहे.

वर्धा नांदेड ही बस वर्धा येथून सकाळी 7 वाजता सुटणार असून वर्धा, यवतमाळ, आर्णी मार्गे नांदेड येथे पोहोचणार आहे. या बसचे भाडे प्रौढांसाठी 435 रुपये व जेष्ठ नागरिकांसाठी 220 रुपये आकारण्यात येणार आहे.

दिवाळीनिमीत्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जाणा-या व येणा-या समुहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी याकरीता अँडव्हांस बुकींगची सोय विभागातील सर्वच बसस्थानकावरून करून देण्यात आलेली आहे.

जेष्ठ नागरीकांना देय असलेल्या तिकीट दराच्या सवलतीसह ॲडव्हांस बुकींग सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवाशांनी या जादा बससेवेचा लाभ घेण्यासाठी आगार प्रमुख, बसस्थानक प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ग्रामिण भागातील प्रवाशांना आपआपल्या गावी अथवा ईच्छितस्थळी जाण्यासाठी दि.8 ते 30 नोव्हेंबर कालावधीत स्थानिक पातळीवर वर्धा बसस्थानकावरून नागपुर यवतमाळ, आर्वी बसस्थानकावरून अमरावती, वरूड, मोर्शी, हिंगणघाट बसस्थानकावरून चंद्रपुर, नागपुर, वर्धा, अमरावती, तळेगाव बसस्थानकावरून नागपुर, अमरावती, मोर्शी, वर्धा, वरुड, अमरावती मार्गे कु-हा, पुलगाव बसस्थानकावरून वरूड, चंद्रपुर, अमरावती, वर्धा अशा मार्गावर प्रवाशी गर्दी लक्षात घेता बसेसची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

नागरिकांनी आपला प्रवास कोणत्याही अवैध वाहनाने करू नये तसेच आरक्षणाकरीता महामंडळाच्या आरक्षण तिकीट केंद्र, ई-तिकीट योजनेचा लाभ घ्यावा, असे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे गृहनिर्माण, पतसंस्थांवर चर्चासत्र | BulletsIn
मुख्यमंत्र्यांनी घेतले करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन
सोलापूर – १७ व्या मजल्यावरुन उडी मारुन मुलतानी बेकरीच्या मालकाची आत्महत्या
छ. संभाजीनगर – स्वामी ब्रम्हानंद महाराज विद्यालयात क्रीडा स्पर्धेला प्रारंभ
निवृत्तीवेतनधारकांसाठी २१ रोजी मेळाव्याचे आयोजन

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापूर – हातभट्ट्यांवर छापे; सात जणांना अटक
Next Article ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला अखेरची संधी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?