छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचलित स्वामी ब्रम्हानंद महाराज विद्यालय, पिंप्री राजा ता. छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला आहे. आज पैठण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी या क्रीडा स्पर्धेला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
खेळ हा केवळ शारीरिक तंदुरुस्तीचा नव्हे तर शिस्त, जिद्द, संघभावना आणि आत्मविश्वास वाढविण्याचा उत्तम मार्ग आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता दाखवून गावाचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
—————
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis
