पुणे 12 जानेवारी (हिं.स): मुंबईच्या दिशेने जाणारी डेक्कन क्विन रेल्वे लोणावळा येथे अडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणावळा येथील स्थानिकांनी ही रेल्वे गाडी तब्बल २० मिनिटे अडवून ठेवली.
लांब पल्ल्यांच्या आणि वंदे भारत रेल्वे लोणावळा येथे थांबवण्यात यावी या मागणीसाठी स्थानिकांकडून आंदोलन करण्यात आले. या मागण्यासाठीच नागरिकांकडून रेल्वे रोको करण्यात आला. यावेळी शेकडो स्थानिक नागरिक हे या आंदोलनात सहभागी झाले होते. अखेर आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढली. त्यानंतर ही रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
हिंदुस्थान समाचार
